सातारा : रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनानंतर ग्रीन पॉवर शुगरकडून थकीत ऊस बिले अदा

सातारा : रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनानंतर गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर कारखान्याने १०७ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे बँकेत जमा केले आहेत. ग्रीन पॉवर शुगरने गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये या शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवले होते. याप्रश्नी रयत क्रांती संघटनेने २५ जूनला कारखान्याच्या कार्यस्थळावर धरणे आंदोलन केले. त्यावेळी कारखाना प्रशासनाने एक जुलै रोजी पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले न गेल्याने रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दोन जुलै रोजी पुन्हा आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर कारखाना प्रशासनचे मोरे यांनी १०७ शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा केले आहे, असे सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. उर्वरित शेतकऱ्यांचे बिल नऊ तारखेला जमा करतो, अशी लेखी हमी देण्यात आली आहे. यावेळी यत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी, पुसेसावळी गटाचे सुहास पिसाळ, सौरभ चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here