सातारा : कृष्णा कारखान्यात इथेनॉल उत्पादन सुरू

सातारा : शिवनगर येथील कृष्णा कारखान्यात या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन संचालक जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करून, टँकर ऑईल कंपनीकडे रवाना करण्यात आला. इथेनॉल टँकरच्या पूजन प्रसंगी संचालकांसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कारखाना प्रशासनाने सांगितले की, शिवनगर येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या दूरदृष्टीतून कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून साखरेसह पूरक उद्योगांची जोड देऊन, सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करत आहे. कारखाना नेहमीच साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here