सातारा : कृष्णा साखर कारखान्याचा उच्च तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

सातारा : देशातील साखर क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे (नवी दिल्ली) येथे आयोजित सोहळ्यात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठी प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, त्यांच्या सुविद्य पत्नी उत्तरा भोसले यांच्यासह संचालक मंडळाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. २०२३-२४ या हंगामासाठी उच्च साखर उतारा गटात, उच्च तांत्रिक कार्यक्षमतेसाठीच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड जाहीर केली होती.

कृष्णा कारखान्याची वाटचाल अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टपणे सुरू आहे. याची दखल घेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तांत्रिक कार्यक्षमतेचा गौरव केला. यावेळी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांधनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, सरव्यवस्थापक (तांत्रिक) बालाजी पबसेटवार, प्रमोद पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here