सातारा : सर्वोत्कृष्ट डिस्टिलरीसाठी कृष्णा कारखान्यास राष्ट्रीय पुरस्कार

सातारा : देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्या वतीने येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टिलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याच्या सर्व कार्याची नोंद घेत संस्थेने हा पुरस्कार कृष्णा कारखान्याला जाहीर केला आहे. भारतीय शुगरच्यावतीने कोल्हापूर येथे शुक्रवारी साखर परिषदेच्या वार्षिक पारितोषिक सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कारखान्यास सर्वोत्कृष्ट डिस्टिलरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नवनवीन प्रयोग करत हा बहुमान मिळवला आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार यांनी दिली.

कृ्ष्णा कारखान्याने देशी मद्य, रेक्टीफाईड स्पिरीट आदींचे उत्पादन घेतले जाते. कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये सर्वोच्च फर्मन्टेशन आणि डिस्टलेशन कार्यक्षमतेसह १२८ टक्के प्रकल्प क्षमतेचा वापर केला आहे, तसेच निर्धारित वेळेत ऑइल कंपन्यांना संपूर्ण इथेनॉल प्रमाणाचा पुरवठा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. कारखान्याने साखर उत्पादनासोबतच उपपदार्थ निर्मितीवर भर दिला आहे. कारखान्याने ग्राहक मानकांची पूर्तता करून उच्च प्रतीचे इथेनॉल, रेक्टिफाइड स्पिरीटची उच्च गुणवत्ता सातत्याने राखली आहे. त्यामुळे कारखान्याने हा पुरस्कार पटकावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here