सातारा : माण तालुका को अँग्रो प्रा. लि. पडळ कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रभाकर घार्गे, संचालक, अधिकारी वर्ग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यातून कारखान्याची घोडदौड प्रगतीपथावर आहे. प्रतिवर्षी शेतकऱ्यांच्या उसास चांगला दर देण्याचा कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न असतो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे को-चेअरमन, आमदार मनोज घोरपडे यांनी केले.
७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खटाव -माण तालुका अँग्रो प्रो. लिमिटेड पडळ या कारखान्यावर आमदार मनोज घोरपडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.या कारखान्यामार्फत कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याची बिले थकीत न राहिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास वाढला आहे. त्यांच्याच सहकार्यातून यावर्षीचा गळीत हंगाम एप्रिल महिना अखेरीपर्यंत चालेल असो आपणास विश्वास आहे, असेही आमदार मनोज घोरपडे म्हणाले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे, संचालक महेश घार्गे, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक टेक्निकल डायरेक्टर सनी क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक मल्हारी नाकाडे, चीफ अकाउंटंट अजित मोरे, मुख्य शेती अधिकारी किरण पवार, डिस्लेरी मॅनेजर एल. जी. पाटील, चिफ केमिस्ट गोरख कदम, लॅबोरेटरी चीफ जयवंत ताटे व कारखान्यातील कामगार उपस्थित होते.











