सातारा : कृष्णा कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण – अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

सातारा : रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६६ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा झाला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा भोसले यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले म्हणाले कि, या गळीत हंगामात १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उपपदार्थ निर्मितीला मोठी मागणी असून येत्या काळात विविध प्रकारच्या साखरेचे उत्पादन सुरू होणार आहे. कृष्णा कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण झाल्याची घोषणा अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली.

अध्यक्ष डॉ. भोसले म्हणाले, कारखान्याला फॉरेन लिकर तयार करण्याची परवानगी मिळाली असून त्याचा कारखान्याला आर्थिक लाभ होईल. संचालक मंडळाने गेल्या दशकात पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सभासदकेंद्री कामकाज केले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, संचालिका जयश्री पाटील, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई उपस्थित होते. बाजीराव सुतार यांनी स्वागत केले. एम. के. कापूरकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here