सातारा : कोल्हापूर येथे भारतीय शुगरच्यावतीने राष्ट्रीय साखर परिषद आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार सोहळ्याला कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, बाजीराव सुतार, प्रमोद पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले, विकास आभाळे उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साखर उत्पादनासोबतच उपपदार्थ निर्मितीवर निर्मितीवर भर दिला आहे. कृष्णा कारखान्याच्या डिस्टीलरीमध्ये सर्वोच्च फर्मन्टेशन आणि डिस्टलेशन कार्यक्षमतेसह १२८ टक्के प्रकल्प क्षमतेचा वापर केला आहे. कारखान्यात उच्च प्रतीचे इथेनॉल, देशी मद्य, रेक्टिफाईड स्पिरिट इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. पुरस्कार वितरण सोहळ्यास भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे व मुख्य संचालन अधिकारी संग्रामसिंह शिंदे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूरमधील शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते कृष्णा कारखान्याच्या संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला.