सातारा : ऊस बिले मुदतीत न दिल्यास कारवाईसाठी दबाव वाढवण्याचा राजू शेट्टींचा इशारा

सातारा : ऊस तोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, यासाठी साखर आयुक्तांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी आरआरसी सर्टिफिकेट घेऊन कारवाई केली जावी यासाठी दबाव वाढवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. आम्हाला सत्तेच्या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पावित्र्य डागाळायचे नाही. अलिकडे राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांच्या थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here