सातारा: सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ गळीत हंगामात १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान कारखान्याकडे आलेल्या उसास प्रतिमेट्रिक टन ३५०० रुपयेप्रमाणे ३७ कोटी ६१ लाख ४५ हजारांची ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी दिली.
‘सह्याद्री’चे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यापूर्वीच नोव्हेंबरमधील पहिल्या पंधरवड्यात आलेल्या उसापोटी २६ कोटी ४० लाख ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. दुसऱ्या पंधरवड्याच्या ऊसबिलाची रक्कम बँक खात्यात जमा केली. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांनी पिकविलेला ऊस सह्याद्री कारखान्याकडे गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

















