सातारा : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वित्त व्यवस्थापक जयेंद्र नाईक, मुख्य शेती अधिकारी व्ही. बी. चव्हाण, शेती अधिकारी नितीन साळुंखे, इंडीपी व्यवस्थापक प्रकाश सोनवणे, मुख्य लेखनिक बी. जे. कुंभार, एम. के. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद शेतकरी यांच्या सहकार्यामुळे कारखान्याच्या विस्तारवाढीचे काम पूर्णत्वास गेले आहे. उसाची प्रतिदिन गाळप क्षमता वाढणार आहे, त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यंत्रणेचे नियोजन करण्यात येणार असून, जास्तीत जास्त उसाचे गळीत केले जाईल. सर्व ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य शेती अधिकारी व्ही. बी. चव्हाण यांनी केले.
यावेळी गजानन देशमुख, अशोक चव्हाण, ताजुद्दीन मुल्ला, मनोहर चव्हाण, हणमंत पाटील, विश्वास थोरात, जयवंत घाडगे, नितीन कदम, तुकाराम गायकवाड, समाधान गोळे, लक्ष्मण उपासे, तानाजी सुर्वे, प्रताप काळभोर, सूरज घार्गे, वनराज जाधव, पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र इंगळे, सदाशिव पवार, दीपक मोहिते, विकास साळुंखे दयानंद सरगर उपस्थित होते.