सातारा : बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने गोवे (ता. सातारा) येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेतीविषयक कार्यशाळा झाली. गोवे येथील सहकार महर्षी जिजाबाअण्णा जाधव स्मारक समिती, जिजाबाअण्णा जाधव विकास सेवा सोसायटी, कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्था आणि बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. मृदा शास्त्राचे विशेषज्ञ संतोष करंजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मदन भोसले होते. यावेळी संतोष करंजे यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानामुळे एकरी ऊस उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ, साखर उताऱ्यात वाढ, पाण्याची ५० टक्के आणि रासायनिक खतांची ३० टक्के बचत, हवामान बदलास पूरक उपाय करणारे एआय तंत्रज्ञान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने विकसित केले आहे.
कार्यशाळेत पुणे येथील इंद्राणी बालन ट्रस्ट आणि पुनित बालन ग्रुपच्या माध्यमातून गोवे, कळंबे व मालगाव हायस्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. या मार्गदर्शन कार्यशाळेत डॉ. विवेक भोईटे, डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, सुजय पवार, अजिंक्यतारा कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, जिल्हा बँकेचे संचालक जयवंतराव केंजळे, कृषी अधिकारी अमृत भोसले, विजय जगदाळे, तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल जाधव उपस्थित होते.