सातारा : ऊस वाहतुकीतील धोके टाळणार, कृष्णा कारखान्यावर ऊस वाहनांना बसविले रिफ्लेक्टर

सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अपघात टाळण्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केली. कऱ्हाड व इस्लामपूर पोलिस अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्यांनी सूचना दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावले. कार्यक्रमास कार्यकारी व्यवस्थापक दादासाहेब शेळके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी वाहतूक अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मार्गदर्शन केले. वाहनांचा वेग ठरवून दिला आहे. अतिवेगाचा वापर करू नये, वाहनचालकांनी व्यसन करू नये, वाहन चालवताना मोठ्या आवाजाने गाणी लावू नयेत, ओव्हरलोड वाहने चालवू नये, यासारख्या गोष्टी टाळून अपघात रोखता येतील असे ते म्हणाले. यावेळी कऱ्हाड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, कऱ्हाडचे मोटार वाहन निरीक्षक धनंजय हिले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवानी सगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गायकवाड, पोलिस अधिकारी संदेश वाघ, बळीराम घुले, संचालक बाबासाहेब शिंदे, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, विलासराव भंडारे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, बहेचे मनोज पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here