मुंबई : भारतीय बेंचमार्क निर्देशांक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी अस्थिरतेच्या वातावरणातही स्थिर राहिले. सेन्सेक्स ७.२५ अंकांनी घसरून ८०,७१०.७६ वर बंद झाला, तर निफ्टी ६.७० अंकांनी वाढून २४,७४१.०० वर बंद झाला. सेन्सेक्स दिवसाची सुरुवात थोडीशी सकारात्मक झाली आणि ८०,७०० च्या आसपास स्थिर राहिला. दिवसाच्या सुरुवातीदरम्यान निफ्टी निर्देशांक २४,६०० आणि २४,८५० च्या दरम्यान व्यवहार करत होता आणि नंतर २४,७५० च्या खाली नऊ अंकांनी बंद झाला.
एम अँड एम, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि पॉवर ग्रिड या निफ्टीमधील प्रमुख शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली तर आयटीसी, टीसीएस, सिप्ला, एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये घसरण झाली. गुरुवारच्या ८८.१५ च्या बंदच्या तुलनेत शुक्रवारी भारतीय रुपया ११ पैशांनी घसरून ८८.२६ प्रति डॉलरवर बंद झाला.मागील सत्रात, सेन्सेक्स १५०.३० अंकांनी वाढून ८०,७१८.०१ वर बंद झाला, तर निफ्टी १९.२५ अंकांनी वाढून २४,७३४.३० वर बंद झाला.