मुंबई : गुरुवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. त्यामध्ये सेन्सेक्स १७०.२२ अंकांनी घसरून ८३,२३९.४७ वर बंद झाला, तर निफ्टी ४८.१० अंकांनी घसरून २५,४०५.३० वर बंद झाला.अपोलो हॉस्पिटल्स, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज लॅब्स, ओएनजीसी, मारुती सुझुकी हे निफ्टीमधील प्रमुख वधारलेले शेअर होते, तर एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्हमध्ये घसरण झाली.
गुरुवारी भारतीय रुपया ८५.७१ च्या मागील बंदच्या तुलनेत ३९ पैशांनी वधारून ८५.३२ प्रति डॉलरवर बंद झाला. मागील सत्रात, सेन्सेक्स २८७.६० अंकांनी घसरून ८३,४०९.६९ वर, तर निफ्टी ८८.४० अंकांनी घसरून २५,४५३.४० वर बंद झाला होता.