मुबई : २३ सप्टेंबर रोजी देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स, निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद झाले.सेन्सेक्स ५७.८७ अंकांनी घसरून ८२,१०२.१० वर बंद झाला, तर निफ्टी ३२.८५ अंकांनी घसरून २५,१६९.५० वर बंद झाला. इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्समध्ये तेजी पाहायला मिळाली तर ट्रेंट, टेक महिंद्रा, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
रुपया डॉलरच्या तुलनेत ८८.४६ वर घसरला. मागील हंगामात, सेन्सेक्स ४६६.२६ अंकांनी घसरून ८२,१५९.९७ वर बंद तर निफ्टी १२४.७० अंकांनी घसरून २५,२०२.३५ वर बंद झाला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग तिसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाले. सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे वाहन कंपन्यांचे शेअर्स वधारले.