मुंबई : ११ सप्टेंबर रोजी गुरुवारी भारतीय शेअर बाजार निर्देशांक वधारले.सेन्सेक्स १२३.५८ अंकांनी वधारून ८१,५४८.७३ वर बंद झाला, तर निफ्टी ३२.४० अंकांनी वधारून २५,००५.५० वर बंद झाला.अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड या निफ्टीमधील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली, तर बजाज ऑटो, इन्फोसिस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, विप्रो, टायटन कंपनीमध्ये घसरण पाहायला मिळाली.
भारतीय रुपया गुरुवारी ८८.४४ प्रति डॉलरवर ३४ पैशांनी घसरून ८८.४४ वर बंद झाला, तर बुधवारी ८८.१० वर बंद झाला होता. मागील सत्रात, सेन्सेक्स ३२३.८३ अंकांनी वधारून ८१,४२५.१५ वर तर निफ्टी १०४.५० अंकांनी वधारून २४,९७३.१० वर बंद झाला होता.