मुंबई : सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारला. सेन्सेक्स ३१९.०७ अंकांनी वधारून ८३,५३५.३५ वर तर निफ्टी ८२.०५ अंकांनी वधारून २५,५७४.३५ वर बंद झाला. शुक्रवारच्या ८८.६६ च्या बंदच्या तुलनेत सोमवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ८८.६९ वर स्थिर राहिला.
निफ्टीमध्ये इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, विप्रो हे प्रमुख वधारले, तर ट्रेंट, अपोलो हॉस्पिटल्स, मॅक्स हेल्थकेअर, पॉवर ग्रिड आणि टाटा कंझ्युमरमध्ये घसरण पहायला मिळाली. मागील सत्रात, सेन्सेक्स ९४.७३ अंकांनी घसरून ८३,२१६.२८ वर तर निफ्टी १७.४० अंकांनी घसरून २५,४९२.३० वर बंद झाला होता.












