सेन्सेक्स ४१० अंकांनी वधारला, निफ्टी २४,८०० च्या वर बंद

मुंबई : २१ मे रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक वधारला. सेन्सेक्स ४१०.१९ अंकांनी वधारून ८१,५९६.६३ वर बंद झाला, तर निफ्टी १२९.५५ अंकांनी वधारून २४,८१३.४५ वर बंद झाला. निफ्टी रिअॅलिटी निर्देशांक सर्वात जास्त १.७ टक्के वाढला. त्यापाठोपाठ निफ्टी फार्मा आणि निफ्टी पीएसयू बँक अनुक्रमे १.३ टक्के आणि ०.७ टक्के वाढ पाहायला मिळाली. निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल अनुक्रमे ०.७ टक्के आणि ०.४ टक्के वाढले. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये ०.५ टक्के घसरण झाली. मंगळवरच्या सत्रात सेन्सेक्स ८७२.९८ अंकांनी घसरून ८१,१८६.४४ वर तर निफ्टी २६१.५५ अंकांनी घसरून २४,६८३.९० वर बंद झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here