मुंबई : २९ जुलै रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ४४६.९३ अंकांनी वधारून ८१,३३७.९५ वर बंद झाला, तर निफ्टी १४०.२० अंकांनी वधारून २४,८२१.१० वर बंद झाला. निफ्टीमध्ये जिओ फायनान्शियल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले तर एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टीसीएस, अॅक्सिस बँक, एचडीएफसी लाईफ, टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
सोमवारच्या ८६.६५ च्या तुलनेत मंगळवारी भारतीय रुपया ८६.८२ प्रति डॉलरवर बंद झाला. मागील सत्रात सेन्सेक्स ५७२.०७ अंकांनी घसरून ८०,८९१.०२ वर तर निफ्टी १५६.१० अंकांनी घसरून २४,६८०.९० वर बंद झाला होता.