मुंबई : ८ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले.सेन्सेक्स ७६.५४ अंकांनी वधारून ८०,७८७.३० वर बंद झाला, तर निफ्टी ३२.१५ अंकांनी वधारून २४,७७३.१५ वर बंद झाला.
टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, एम अँड एम, बजाज ऑटो हे निफ्टीमधील प्रमुख वधारलेल्या कंपन्यांमध्ये समावेश होता, तर ट्रेंट, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्रामध्ये घसरण पाहायला मिळाली. मागील सत्रात सेन्सेक्स ७.२५ अंकांनी घसरून ८०,७१०.७६ वर तर निफ्टी ६.७० अंकांनी वधारून २४,७४१.०० वर बंद झाला होता.