सातारा : कापशी (ता. फलटण) येथील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज लि. कारखाना चालू गळीत हंगाम २०२५- २६ साठी उच्चांकी असा ३४०० रुपये ऊस दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी केली आहे.
पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटनाप्रमाणे देण्यात येणार असून, उर्वरित २०० रुपये दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील. सोलापूर व सांगली या दूरच्या भागातून येणाऱ्या गेटकेन उसालाही पहिली उचल प्रतिटन ३२०० रुपये दिली जाणार असून, दिवाळी सणापूर्वी त्यांनाही विनाकपात १०० रुपये देऊन एकूण ३३०० रुपये दर दिला जाणार आहे. पहिल्या पंधरवड्यात आलेल्या संपूर्ण उसाचे बिल पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शरयूने अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.


















