सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यंदाच्या हंगामात आतापर्यंत ८ लाख मे.टन गाळप पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. आमदार पाटील म्हणाले कि, कारखान्याने नेहमीच शेतकरी, सभासद यांचा हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
ते म्हणाले, कारखान्याचे हजारो सभासद, ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी-कर्मचारी, ऊस तोडणी मजूर-मुकादम, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्या योगदानामुळे गाळप पूर्ण कार्यक्षमतेने सुरु आहे. त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

















