सोलापूर : जिल्ह्यात दीड कोटी टन उसाचे गाळप, १८ कारखान्यांचा हंगाम आटोपला

सोलापूर : राज्यात सर्वाधिक उसाचे गाळप आणि साखर उत्पादन सोलापूर जिल्ह्यात होते. यावर्षीही सोलापूर जिल्ह्याने ऊस गाळप व साखर उत्पादनातील आघाडी कायम ठेवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत १८ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आजअखेर जवळपास १ कोटी ५६ लाख ८२ हजार टन उसाचे गाळप करून १ कोटी ३८ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप आणि साखर उत्पादनातील आघाडी यंदाही कायम राखली आहे. मात्र, सरासरी विचार करता जिल्ह्यात सुमारे १८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे.

यावर्षी साखर उतारा घटल्याने कारखान्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यंदा बहुतांश कारखान्यांना ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. राज्यात ९.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे, तर ९.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा राज्यात आतापर्यंत १८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित कारखाने येत्या आठवडाभरात बंद होतील अशी शक्यता आहे. दरम्यान, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे १५ लाख तर अन्य मोठ्या कारखान्यांचे १० लाख टनाच्या आत गाळप झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना सरासरी साखर उतारा ८.९२ टक्के इतका मिळाला आहे. बहुतांश कारखान्यांना अपेक्षित साखर उतारा मिळवता आला नसल्याने साखरेचे उत्पादन कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here