सोलापूर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदूर येथे २०२५-२०२६ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी व वाहतूक करारचा शुभारंभकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. आवताडे शुगरने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन सोमनाथ आवताडे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, माजी उपसरपंच सुहास पवार, शेती अधिकारी राहुल नागणे, उप शेती अधिकारी तोहिद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, चिफ अकाऊटंट बजरंग जाधव, एच.आर मॅनेजर डी. बी. बळवंतराव, हार्वेस्टर मालक दादासो गायकवाड, महेश निकम, अंबादास लवटे, बिरा लोखंडे, संतोष लोखंडे, संदीप पवार, रामचंद्र पाटील, वाहन मालक उपस्थित होते.