सोलापूर : करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाने एकतर्फी विजय मिळवत कारखान्यावरील आपली सत्ता कायम ठेवली. बागल गटाच्या आठ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित नऊ जागांवरही विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. कारखान्याच्या १७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी विरोधी गटाचे केवळ सात अर्ज मंजूर झाले. त्यापैकी दोघांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत बागल गटाला प्रा. रामदास झोळ आणि मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले यांनी आव्हान दिले होते. पण त्यांचे अर्ज छाननीतच बाद झाल्याने निवडणूक एकतर्फी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. विजयी उमेदवार असे, सतीश नीळ, दिनकर सरडे, सचिन पिसाळ, युवराज रोकडे, नवनाथ बागल, बापू चोरमले, आशिष गायकवाड, अनिल अनारसे, अजित झांजुर्णे, रामचंद्र हाके, रेवन्नाथ निकत, संतोष पाटील, बाळासाहेब पांढरे, दिनेश भांडवलकर, अमोल यादव, कोमल करगळ, अश्विनी झोळ.
Recent Posts
चीनी सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ का X अकाउंट भारत में बंद कर दिया गया
नई दिल्ली : हाल ही में एक घटनाक्रम में, चीनी सरकारी प्रचार मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ का खाता भारत में बंद कर दिया गया है।
ग्लोबल...
ब्राझील : कर्ज कमी करण्यासाठी ‘रायझेन’ची साखर कारखाना विक्रीस सहमती
साओ पाउलो : कोसान एसए आणि शेल पीएलसी यांच्या सह-मालकीच्या ब्राझिलियन इथेनॉल उत्पादक आणि इंधन वितरक कंपनी रायझेन एसएने (Raizen SA) कर्ज कमी करण्याच्या...
अहिल्यानगर : तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर ?
अहिल्यानगर : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात १७३ इच्छूक उमेदवार आहेत. माघारीची मुदत तीन दिवसांवर आली आहे. आठवडा उलटत असताना एकाही इच्छुकाने माघारीचा...
चीनी मिलों द्वारा सीधे किसानों के बैंक खातों में भेजा जाएगा गन्ना भुगतान
हापुड़, उत्तर प्रदेश: गन्ना भुगतान प्रक्रिया को सरल और सुलभ बनाते हुए चीनी मिलों द्वारा सीधा किसानों के बैंक खातों में भुगतान करने का...
फिजी : ऊस उत्पादकांसह त्यांच्या कुटुंबियांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळणार
सुवा : भारताची एमआयओटी पॅसिफिक मेडिकल आणि एमआयओटी हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (एमआयओटी) आणि फिजीच्या ऊस उत्पादक परिषद यांच्यात या आठवड्यात एक महत्त्वाचा करार होईल,...
Government begins talks with auto OEMs over new ethanol blending target: Media report
The government has initiated discussions with Indian automobile original equipment manufacturers (OEMs) to set new ethanol targets. Major Indian OEMs include Tata Motors, Mahindra...
Magadh Sugar & Energy delivers strong Q4FY25 performance
The Board of Directors of Magadh Sugar & Energy Limited (MSEL) at its meeting held on May 13, 2025, took on record the unaudited...