सोलापूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ हभप जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आला. धनश्री व सीताराम परिवाराचे प्रवर्तक प्रा. शिवाजीराव काळुंगे, अध्यक्षा प्रा. शोभा काळुंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, संचालिका दीपाली काळुंगे-पाटील, स्नेहल काळुंगे-मुदगल, कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड, शिखर पाटील यांसह दहा वाहन मालकांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी तब्बल ८ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड यांनी सांगितले.
डॉ. काळुंगे- गायकवाड यांनी सांगितले की, कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांची आणि वाहनमालकांची बिले वेळेवर दिल्याने कारखान्यावरील विश्वास वाढला आहे. कारखाना ताब्यात घेतला, त्यावेळी २०११ मध्ये गाळप क्षमता २५०० मे. टन होती. ती ७५०० मे. टनापर्यंत नेण्यात आली. यंदा १५० दिवसांचा हंगाम होईल असे नियोजन आहे. याप्रसंगी हभप जयवंत महाराज बोधले, प्रा. शिवाजीराव काळुंगे, चेअरमन प्रा. शोभा काळुंगे, सुयोग गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. योगेश ताड, बिभीषण ताड, अॅड. शैलेश हावनाळे, प्यारेलाल सुतार, नानासाहेब जाधव उपस्थित होते.


















