सोलापूर – दामाजी कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा दर दिला : चेअरमन शिवानंद पाटील

सोलापूर : दामाजी सहकारी साखर कारखान्याने गत गळीत हंगामात ऊस उत्पादकांना वेळेत २८०० रुपये हा एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. कामगारांचे पगार, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची देणी, पीएफ व इतर कपाती नियमितपणे अदा करण्यात आल्याचे चेअरमन शिवानंद पाटील यानी सांगितले. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभेत त्यांनी ही माहिती दिली. माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार यांनी कारखान्याने सहप्रकल्प उभारणीवर भर द्यावा, अशी सूचना केली.

येणाऱ्या गळीत हंगामात सर्व यंत्रणा सज्ज केली असून, या गळीत हंगामात साडेपाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. उसाला इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे. ३० वर्षांच्या समाजकारण व राजकारणाचे कालावधीत सर्व सहकाऱ्यांना समजून घेऊन योग्य निर्णय घेत असल्याने मला चेअरमन पदाची संधी दिली आहे. सर्वांना समान वागणूक देत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत सर्व घटकांना सामावून घेऊन काम केले आहे. दुजाभाव केला नाही व करणारही नाही, असे सुतोवाच चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.

व्यासपीठावर राहुल शहा, रामचंद्र वाकडे, दामोदर देशमुख, व्हाइस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, लतिफ तांबोळी, मारुती वाकडे, महादेव फराटे, भारत पाटील, तसेच शिवाजीराव नागणे, कल्याण रोकडे, शिवाजीराव पवार, रामेश्वर मासाळ, प्रवीण खवतोडे, किसन सावंजी, सुनील डोके, राजकुमार बिराजदार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले. आभार संचालक रेवणसिद्ध लिगाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here