सोलापूर : ‘पांडुरंग’चे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची सौर ऊर्जा समितीवर निवड

सोलापूर : नाटोली (ता. शिराळा) येथील सुपुत्र व श्रीपूर (ता. माळशिरस) डॉ. यशवंत कुलकर्णी येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अपारंपरिक सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठीच्या समितीवर निवड करण्यात आली.

साखर कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली असून, ‘महाप्रीत’मार्फत तयार करण्यात आलेल्या प्राथमिक व सविस्तर प्रकल्प अहवालांची छाननी करून कारखान्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक विकास व शाश्वत धोरणांचा समन्वय साधत डॉ. कुलकर्णी यांनी कारखान्याच्या कार्यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ सौर ऊर्जा प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीस होणार असल्याने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. या निवडीबद्दल अध्यक्ष प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here