सोलापूर : लोकशक्ती- अथर्व शुगरच्या प्रथम गळीत हंगामाचा आज शुभारंभ

सोलापूर : अथर्व ग्रुप ऑफ कंपनीज् लोकशक्ती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड औराद (मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) चा प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व मोळी पूजन सोहळा आज (8 डिसेंबर) रोजी होत आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधव, ऊस तोडणी ठेकेदार, कंत्राटदार, व्यापारी बांधव, हितचिंतक व कर्मचारी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अथर्व ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन मानसिंग खोराटे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर (भाऊ) डोंगरे यांनी केले आहे. मोळी पूजन मनोहर डोंगरे आणि उद्योजक शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे, पार्टनर सुनील गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे व्हाईस प्रेसिडेंट के. एस. चौगले यांनी कळविले आहे.

लोकशक्ती- अथर्व शुगरतर्फे गाळप हंगामाची जय्यत तयारी

तेरामैल (औराद) येथील लोकशक्ती शुगरच्या गाळप हंगामाची अथर्व कंपनीने जय्यत तयारी केली आहे. तोडणी आणि वाहतुकीचे करार केले आहेत. त्यानुसार अॅडव्हान्स रक्कम अदा केली आहे. १२ वर्षापासून बंद असलेला लोकशक्ती शुगर कारखाना कोल्हापूर येथील अथर्व ग्रुपने घेतला असून अथर्व कंपनीने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत देण्याचा विश्वास दिला.

साखर उद्योगात ‘अथर्व’ची यशस्वी वाटचाल…

यापूर्वी कोल्हापुरातील अनेक वर्षे बंद असलेला चंदगड तालुक्यातील दौलत कारखाना ‘अथर्व’ने यशस्वीपणे चालवला आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन, आर्थिक शिस्त यांच्या आधारे कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून दिली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी यंत्रणा आणि वाहतूक यंत्रणा सक्षमपणे कार्यरत करण्याची त्यांची परंपरा आहे. लोकशक्ती शुगरच्या बाबतीत अथर्व ग्रुपचे संस्थापक मानसिंग खोराटे आणि व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे योग्य ती काळजी घेत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

गिरणी कामगाराच्या मुलाची गरुडझेप…

अथर्व ग्रुपचे चेअरमन मानसिंग खोराटे यांची गिरणी कामगारांचा मुलगा अशी ओळख होती. साखरेच्या खरेदी-विक्री व्यवहारात त्यांनी चांगलाच जम बसवला असून, स्वतः उत्तम प्रतीची साखर निर्मिती करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. व्यवसायाची उत्तम घडी बसल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपनी उभारण्यात ते यशस्वी ठरले आहेत. अथर्व कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला आहे. योग्य वजन, वेळेवर ऊस बिले, उत्तम व्यवस्थापन याद्वारे हा विश्वास मिळतो.गळीत हंगाम घेण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here