सोलापूर : महाराष्ट्रातील पहिल्या शुगर चषक २०२५ टेनिस क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

सोलापूर : खर्डी येथील सीताराम शुगरचे संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्रातील पहिल्या शुगर चषक २०२५ टेनिस क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांना उत्साहात सुरूवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आवताडे शुगर, सहकार महर्षी शुगर, भैरवनाथ शुगर व सीताराम शुगर खर्डी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या दिवशी फलंदाजांनी स्पर्धा गाजवल्याचे दिसून आले.

पहिल्या सामन्यात आवताडे शुगर्सने विजय मिळवला. आवताडे शुगर विरुद्ध लोकमंगल शुगर यांच्यातील या सामन्यात आवताडे शुगरने ७ षटकात सर्वबाद ४४ धावा केल्या. लोकमंगल संघ ४० धावांमध्येच गडगडला. आवताडे शुगरने ४ धावांनी हा सामना जिंकला. त्यानंतर सहकार महर्षी विरुद्ध श्री विठ्ठल सहकारी संघामधील सामन्यात सहकार महर्षी संघाने नितीन फुले याच्या १८ चेंडूत ४६ धावांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे ८ षटकात १०२ धावा केल्या.

प्रत्युत्तरामध्ये श्री विठ्ठल सहकारी संघ ८ षटकात केवळ ४९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. तिसरा सामन्यात भैरवनाथ शुगर विरुद्ध आष्टी शुगर संघादरम्यानच्या सामन्यात भैरवनाथ संघाने कृष्णा आबोळेच्या २८ चेंडूत ६९ धावांच्या तुफानी खेळीमुळे ८ षटकात १०० धावांचे लक्ष्य आष्टी शुगर संघाला दिले. आष्टी शुगर संघाने ८ षटकात केवळ ५३ धावा केल्या. चौथ्या सामन्यात सीताराम शुगर संघाने ८ षटकात ९३ धावा करत कुर्मदास शुगर संघासमोर ९४ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात कुर्मदास संघ केवळ ४९ धावाच करू शकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here