सोलापूर : सहकार महर्षी कारखान्यात मिल रोलर पूजन, ९ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

अकलूज : शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले. कारखान्याचे संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६साठी ९ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले की, कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. शेती विभागामार्फत ऊस तोडणी, वाहतुकीचे करार सुरू आहेत. ते काम अंतिम टप्प्यात आहेत. व्हाइस चेअरमन शंकरराव माने- देशमुख, संचालिका सुजाता शिंदे, तज्ज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे, पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, श्रीकांत बोडके व हर्षाली निंबाळकर आदींसह अधिकारी, कामगार व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here