सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम संचालक सिद्राम मदने यांच्या हस्ते पार पडला. आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कारखान्याचे किमान ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणारी ऊसतोडणी, वाहतूक यंत्रणा, मशीनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक बिभीषण वाघ, सनील चव्हाण संचालक संभाजी कोकाटे, राजेंद्र टेकले, कॅन्सलटंट सुमन शर्मा, चंद्रसेन जाधव, अनिल गवळी, तात्यासाहेब नागटिळक, सिद्राम मदने, संतोष सावंत, बाळासाहेब गवळी, प्रभारी मुख्य अधिकारी खालिद शेख, मुख्य शेती अधिकारी एम. ए. पाटील, राजाराम बाबर, भारत पाटील, किसन जाधव, झाकिर मलाणी उपस्थित होते