सोलापूर : लोकमंगल साखर कारखान्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास प्रारंभ

सोलापूर : भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना येथे ४ ते १० मार्च दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहास कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, नामफलकाचे उद्घाटन तथा सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन प्रारंभ झाला. कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक असतात. यंदाच्या वर्षी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना या सप्ताहामध्ये काम करीत असताना घ्यावयाच्या सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण, विद्युत सुरक्षा, रस्ते सुरक्षा, प्रथमोपचार प्रशिक्षण, फायर प्रतिबंध प्रात्यक्षिके आपत्कालीन परिस्थिती व त्याचे नियोजन, पर्यावरण सुरक्षितता, कारखाना परिसरामध्ये वृक्ष लागवड, कर्मचाऱ्यांकरिता स्लोगन स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे.

या सप्ताहाचा समारोप १० मार्च रोजी होणार असुन, निरनिराळ्या स्पर्धेतील विजेत्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.याप्रसंगी कारखान्याचे संचालक पराग पाटील, सरव्यवस्थापक प्रशांत पाटील, टेक्निकल जनरल मॅनेजर, गजराज रुद्रामठ, प्रोसेस जनरल मॅनेजर, एस. गुनशेखरन, जनरल मॅनेजर दीपक नलवडे, चीफ केमिष्ट किशोर जोशी, एच आर नंदकिशोर कदम, इन्स्ट्रुमेंन्ट मॅनेजर सबरी, डेपुटी इलेक्ट्रीकल मॅनेजर राहुल खटके, डेप्युटी इ.डी.पी. मॅनेजर अमोल म्हमाणे, टाईम किपर श्रीशैल लोखंडे, सेफ्टी ऑफिसर दिनेश विरदे, तानाजी पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here