सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट नंबर ५च्या वतीने चेअरमन बाबुराव बोत्रे – पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी आयोगित रक्तदान शिबिरात उस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी, तोडणी कामगार आदी १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन माणूसकी जपली गेली. रक्तदानासह वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा झाला.
यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध प्रकारची फळझाडे आणि सावली देणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. तडवळ आणि मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कारखान्याचे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड तसेच सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी, शेतकरी, वाहतूक व तोडणी ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.