सोलापूर : ओंकार साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा रक्तदानात उच्चांक, सर्व युनिटमध्ये ७५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सोलापूर : ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव मगर (ता. माळशिरस) येथे रक्तदान शिबिरात कर्मचारीवर्गाबरोबर ऊस उत्पादक महिला व शेतकरी यांनीही सहभाग घेतला. सर्व युनिटमध्ये ७५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश वाटप करण्यात आले.

ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांत बोत्रे पाटील यांनी बंद असणारे साखर कारखाने चालू केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. शेतकऱ्यांचे प्रपंच उभे केले. या भागाचा कायापालट झाला. या परिवाराचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९ युनिटमध्ये समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अनाथालय फळे वाटप, अन्नधान्य किट वाटप, रक्तदान, सर्व युनिटच्या परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here