सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवाराने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण साखर निर्माण करत थायलंडबरोबर ५० हजार टन साखर निर्यातीचा करार केला आहे. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या करारामुळे कारखान्याच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीवर मोहोर उमटवली आहे. या अगोदरही ओंकार परिवाराने इथेनॉलबाबत आंतरराष्ट्रीय कंपन्याबरोबर करार केला आहे. आता या उद्योग समुहाने मिळवलेले यश साखर उद्योगातील मोठे पाऊल मानले जाते.
चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय साखरेचा कराराबद्दल सर्व जनरल मॅनेजर, खाते प्रमुख, कर्मचारीवर्गाने ऊस उत्पादक शेतकरी वाहन मालक बाबूरावजी बोत्रे-पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने अभिनंदन केले. ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील यांनी गेल्या सात वर्षांपासून शेतकरी, कर्मचारीवर्ग यांना केंद्रबिंदू मानून काम केले आहे. यामुळे परकीय चलन मिळण्यास परिवारास यश आल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तर बाबूराव बोत्रे-पाटील यांनी शेतकरी, कर्मचारी वर्गाच्या कामगिरीमुळेच आंतरराष्ट्रीय भरारी मारू शकलो, असे सांगितले.


















