सोलापूर : अक्कलकोट येथील ओंकार शुगर युनिट क्र.१५ या साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा सांगता सोहळा १५ मार्च रोजी पार पडला. ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून हंगामाची सांगता करण्यात आली. ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले कि,प्रतिकूल परिस्थितीतही कारखान्याने २.६२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.ओंकार शुगर ग्रुपने या हंगामात भागातील शेतकऱ्यांना प्रति टन ३००० रुपये असा सर्वोत्तम ऊसदर देत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले कि,ओंकार ग्रुपच्या प्रामाणिक प्रयत्नांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही मोठी साथ दिली. त्यातून चालू गळीत हंगामात कारखान्याने २,६२,८९० मे.टन ऊस गाळप केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड, जनरल मॅनेजर अभयसिंह मानेदेशमुख, सर्व खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. ओंकार ग्रुपच्या नेतृत्वाखाली कारखाना आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत, योग्य दर आणि वेळेवर सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.


















