सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी, ऊस तोड कामगार, वाहन धारक व ऊस वाहतूक ठेकेदार यांचा विश्वास संपादन करण्यात कारखाना यशस्वी झाला आहे. ऊसाला योग्य भाव, कारखाना कर्मचाऱ्यांना वेतन वाढ ऊस तोड कामगार, वाहन धारक व ऊस वाहतूक ठेकेदारांना वेळेवर बिल देऊन ओंकार पॉवर कॉर्पोरेशनचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी एक आदर्श कारखाना व्यवस्थापन कसे असावे, याचे मुर्तीमत उदाहरण तालुक्यात ठेवले आहे. यामुळेच तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल ओंकार शुगरकडे वाढल्याचे पहायला मिळत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील हे यशस्वी झाले आहेत. म्हणूनच सध्या कारखाना कार्यस्थळावर ऊसाने भरलेल्या गाड्यांच्या भल्यामोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बोलल्याप्रमाणे ऊस बिल सन्मानपूर्वक अदा करुन आणि दिवाळी सणात मोफत साखर वाटप करुन माणुसकी जपणारे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांचे मार्गदर्शन आणि ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड कामगार, वाहन धारक व कारखाना कर्मचारी यांनी दाखवलेला विश्वास यावरच ओंकार शुगरची प्रगतीची वाटचाल सुरु आहे, असे मत जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केले.

















