सोलापूर : तडवळ येथे ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि., युनिट-५ गळीत हंगाम २०२५-२६चे बॉयलर अग्नीप्रदीपन व मोळीपूजन कार्यक्रम बाबूराव बोत्रे- पाटील, संचालिका रेखा बोत्रे – पाटील व संचालक ओमराजे बोत्रे- पाटील यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले. यावेळी कारखान्यातर्फे यंदा १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यानी दिली. याचबरोबर उसाला अधिकाधिक दर दिला जाईल. तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर जमा होईल असेही त्यांनी सांगितले.
चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याला पाठवावा असे आवाहन केले. कारखान्याच्या सर्व विभागांनी नियोजनबद्ध तयारी पूर्ण झाली असून, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि कामगार सुरक्षा यावर विशेष भर दिलेला आहे असे बोत्रे-पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड यांनी केले. याप्रसंगी नागणसूरचे श्री १०८ ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, नावदगीचे श्री १०८ ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, हिरेमठ मैंदर्गीचे पानमंगरुळ, श्री १०८ ष. ब्र. निळकंठ महास्वामी, हिरेमठ कल्लहिप्पगेचे श्री १०८ ष. ब्र. गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी, कडबगावचे श्री १०८ ष.ब्र. वीर शिवलिंग शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.









