सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला योग्य बाजारभाव, कारखान्यातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करून त्यांना वेळेवर पगार त्याचबरोबर वाहनधारक व ठेकेदार यांना वेळेवर बिले देण्यात सातत्य ठेवून ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी साखर कारखाना व्यवस्थापन कसे असावे, याचा आदर्श अन्य कारखान्यापुढे ठेवला असल्याचे मत श्रीमद् काशीपीठ ज्ञानसिंहासनाधिश्वर जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
रुद्देवाडी येथील ओंकार शुगरमध्ये श्रीमद् काशीपीठ ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, शिवबसव राजेंद्र महास्वामी तसेच श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील आदींच्या हस्ते साखर पूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, ओंकार ग्रुपने पूर्वीचा बंद पडलेला कारखाना सुरू केल्यानंतर थकीत देणी दिली. चालू वर्षी गाळप करताना शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वागत जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांनी केले.
















