सोलापूर : थकीत ऊसबिलप्रश्नी शिवसेनेचे अक्कलकोटमध्ये रास्ता रोको आंदोलन

सोलापूर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थकीत ऊस बिलप्रश्नी एमएसईबी चौकात अक्कलकोट-सोलापूर येथे रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊसबिले थकीत आहेत. अक्कलकोट विधानसभेतील गोकुळ शुगर, धोत्री, जयहिंद शुगर आचेगाव, मातोश्री व सिद्धेश्वर यासह अनेक कारखानदारांनी १३ जुलैपर्यंत अक्कलकोट विधानसभेतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिले जमा केले नाही तर १४ जुलैपासून तहसील कार्यालयाचे कामकाज बंद पाडणार असल्याचा इशारा पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कारे यांनी दिला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस बिले थकीत ठेवणाऱ्या कारखान्यांविरुद्ध आजएमएसईबी चौकासमोर बायपास रोडवर रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले. तालुका प्रमुख बुक्कानुरे बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, शिवसेना शहर अध्यक्ष राम जाधव, माजी उपनगराध्यक्ष अश्पाक बळोरगी, मल्लिनाथ अरवतकल, शरण सुरवसे, सोपान निकते आदी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी श्रीशैल स्वामी, सिद्धाराम बिराजदार, शरणु हंद्राल, निगप्पा पाटील, उमेश साळुंखे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here