सोलापूर : श्री शंकर सह साखर कारखाना लि. सदाशिवनगर या कारखान्याच्या गळीत हंगाम 2025-26 च्या रोलर पुजनाचा कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, दत्ता चव्हाण, उपसरपंच देवीदास ढोपे, उदय धाईजे, शिवराज निबाळकर, अभिमान सांवत, बिनु पाटील, एकनाथ वाघमोडे, धोंडीराम नाळे, विलास फडतरे, हनुमंत सरगर,भोजराज माने, संतोष शिंदे, लालखान पठान, माऊली निबाळकर, पोपट निंबाळकर, कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, महादेव शिंदे, बाळासाहेब माने, सुधाकर पोळ, शिवाजी गोरे, सुनिल माने, सदाशिव वाघमोडे पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डुबल, चिफ इंजिनिअर समाधान कागदे , चीप केमिस्ट अभिजित माने, चीफ अकौंटंट साधु शेंडगे, शेतकरी अधिकारी आनंदराव गायकवाड, डिस्टलरी मॅनेंजर संजय मोरे, लेबर ऑफिसर कैलास कदम, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, उत्तम सपकाळ आदी उपस्थित होते.