सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसदर प्रश्नी ‘लोकमंगल’ समोर बेमुदत ठिय्या

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर ओंकार शुगरने जिल्ह्यातील आपल्या चार कारखान्यांचे ऊसदर जाहीर केले. त्यांच्या दोन युनिटकडून प्रतिटन तीन हजार तर दोन युनिटकडून प्रतिटन तीन हजार १५० रुपये देण्यात येणार आहे. मात्र, भंडारकवठेच्या लोकमंगल शुगरने अद्याप ऊसदर जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. ८) कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कारखाना प्रशासनाने त्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला, परंतु ऊसदर जाहीर करेपर्यंत हटणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदर जाहीर करण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दोन दिवसांची ‘डेडलाईन’ दिली होती. साखर उताऱ्यातील चोरी व वजनकाट्यात फेरफार याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार कार्यकत्यांनी शनिवारी (ता. ६) तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार पॉवर कॉरिशनच्या गेटसमोर सहा तास ठिय्या आंदोलन केले, कारखाना प्रशासनाने आंदोलनकल्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी (ता. ८) जिल्ह्यातील आपल्या चारही साखर कारखान्यांचे ऊसदर जाहीर केले आहेत.

लोकमंगल शुगरने अद्याप ऊसदर जाहीर केला नाही. कारखाना सुरू होऊन महिना उलटता आहे. उस गाळपानंतर १४ दिवसांत बिल देगे कायद्याने बंधनकारक असताना अद्याप ऊसबिल जमा केले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रतिटन तीन हजार ४०० रुपये पहिली उगल द्यावी, अशी मागणी कारखान्याचे कार्यकारी संचालक पराग पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत मागितली, परंतु ऊसदर जाहीर केल्याशिवाय हटणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत आंदोलन सुरूच होते.

जिल्ह्यात ३३ कारखान्यांच्या ऊस गाळपाला सुरवात होऊन महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, यापूर्वी त्यापैकी १६ साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला होता. राजवी अॅग्रो पॉवर व शिवगिरी अॅग्रो शुगर हे दोन कारखाने वगळता अन्य कारखान्यांचे ऊसदर हे प्रतिटन दोन हजार ८५० रुपयांच्या आत आहेत. आता ओंकार शुगरच्या चारही कारखान्यांनी दर जाहीर केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेले ऊसदर हे अपवाद वगळता प्रतिटन दोन हजार ८५० रुपयांच्या आत आहेत. खरेतर पहिली उचल तीन हजारांची द्यायला हवी. साखर उताऱ्यात चोरी व वजनकाट्यात फेरफार करून शेतकऱ्यांची तूट सुरू आहे. कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. योग्य ऊसदर जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडले जातील, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here