सोलापूर : पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात ५ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी गाळप करून नवा इतिहास घडवला. कारखान्यात ५,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन चेअरमन प्रशांत परिचारक, संचालक भास्कर कसगावडे व हनुमंत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखाना दररोज १० हजार मेट्रिक टन क्षमतेने कार्यरत आहे. सभासद शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रती मेट्रिक टन ३,००० रुपये ऊस दर देण्यात आहे. चालू हंगामात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास चेअरमन प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळपाचा टप्पा पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे ते म्हणाले.

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, चालू हंगामात कारखान्याने आतापर्यंत ६० दिवसांत ५,५३,८६७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १०.५२ टक्के साखर उताऱ्याने ५,०१,१११ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. को-जनरेशन प्रकल्पातून ३.४० कोटी युनिट वीजनिर्मिती करून त्यापैकी १.७५ कोटी युनिट वीज महावितरणला विकली आहे. आसवनी प्रकल्पातून आतापर्यंत ५३ लाख लिटर उत्पादन घेतले आहे. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खळे, संचालक दिनकर मोरे, उमेश परिचारक, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो. यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हनुमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तज्ज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here