सोलापूर : औराद येथील लोकशक्ती शुगर ॲण्ड अलाईड इं.लि. कारखान्याने ३१ डिसेंबरअखेर गळीतास आलेल्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन २,८५० रुपयांप्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत. कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी ही माहिती दिली. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक व पुरवठादार यांनी लोकशक्ती शुगर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, कार्यालयीन अधीक्षक विवेक पवार आदी उपस्थित होते.
यावेळी चेअरमन खोराटे म्हणाले की, गळीत हंगाम २०२५-२६ करिता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व पुरवठादार यांचेकडून ऊस बिलाची रक्कम वेळेत जमा केली आहे. यापुढे गळीतास येणाऱ्या उसाचे बिल वेळेत अदा करण्यास लोकशक्ती शुगर कारखान्याचे व्यवस्थापन कटिबध्द आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकी अधिकारी राजाराम पवार, ऊस पुरवठा अधिकारी राजशेखर निगफोडे, चीफ इंजिनिअर सिद्धेश्वर शिंदे, चीफ केमिस्ट नागेश पवार, इलेक्ट्रिकल मॅनेजर अखिल बिटे, इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजर उमराणी, सिव्हिल इंजिनिअर संजीव करजगी, फायनान्स विभागप्रमुख बाबासाहेब गायकवाड, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड उपस्थित होते.

















