सोलापूर : माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील राजवी ॲग्रो पॉवर प्रा. लि. आलेगाव या साखर कारखान्याच्या वजनकाट्याची शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली असता वजनकाटा अचूक असल्याचे स्पष्ट झाले. सध्या सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून अचानकपणे भरारी पथकाने राजवी ॲग्रो पॉवर प्रा.लि.आलेगाव या साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची तपासणी केली.
वजनकाट्यावर भरलेल्या वाहनाचे प्रत्यक्ष वजन केले व नंतर रिकाम्या वाहनांचे वजन केले असता कोणतीही तफावत दिसून आली नाही. वाहनांचे वजन अचूक होत असल्याचे भरारी पथकाने अहवाल दिला. यावेळी वैधमापन शास्त्र निरीक्षक टी. के. पाटील, वैधमापन उपनियंत्रक ए. डी. गेटमे, राजवी ॲग्रोचे युनिट हेड पोपट क्षीरसागर, टेक्निकल जनरल मॅनेजर सुनील पाटील व केनयार्ड सुपरवायझर रमेश लावंड आदी उपस्थित होते.

















