सोलापूर : विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे पिंपळनेर येथे ऊस तोडणी मजुरांसाठी आरोग्य शिबिर

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळनेर यांच्या मदतीने सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. ७०० ऊस तोडणी मजुरांची तपासणी केल्याची माहिती कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांनी दिली. प्रारंभी उपस्थित डॉक्टर व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते कै. माजी आ. विठ्ठलराव शिंदे यांचे प्रतिमेचे पूजन केले. संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. चालू हंगामात कारखान्याच्या युनिट नंबर एकमध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांना याचा लाभ घेता आला.

यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर येथील सन २०२५-२६ गळीत हंगाम सुरू आहे. गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्यात करण्यात आले आहेत. या मजुरांसाठी कार्यस्थळावर पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने १० डिसेंबर रोजी सर्व रोगनिदान मोहीम राबविली. शिबिरात मजुरांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, केन मॅनेजर संभाजी थिटे, दिलीप लव्हटे, राहुल घाडगे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर, डॉ. शंकर बोरकर, डॉ. शशिकांत पवार, डॉ. सचिन ढवळे, डॉ. यशवंत सातपुते, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा दुधे, डॉ. दीपक भोसले, आरोग्य सहायक संतोष कुटे व स्टाफ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here