सोलापूर : नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजचा सन २०२३-२४ या गळीत हंगामातील उच्चांकी ऊस गाळपासाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री निमुबेन बांभनिया, माजी केंद्रीय मंत्री कुलगुरू सुरेश प्रभू, अरविंद कुमार शर्मा, शिवानंद पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, लक्ष्मीनारायण चौधरी, जयप्रकाश दांडेगावकर, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिट नंबर एकच्या कारखान्याची सन २०२३-२४ या गळीत हंगामातील उच्चांकी गाळपासाठी हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कारासाठी निवड झाली होती. उच्चांकी गाळपामुळे कारखान्याला हा बहुमान मिळाला. नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेकडून ही निवड करण्यात आली होती. या पुरस्कार वितरण समारंभामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.