सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही युनिटमध्ये मिल रोलर पूजन करण्यात आले. युनिट नंबर १ पिंपळनेर येथे उपाध्यक्ष वामनराव उबाळे तर युनिट नंबर २ करकंब येथे संचालक विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विक्रमसिंह शिंदे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
ऊस गाळप हंगाम २०२५- २६ साठी युनिट नंबर १ पिंपळनेर येथे २० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. आजअखेर ३१ हजार ४६३ हेक्टरची ऊसनोंद झाली आहे. युनिट नंबर २ करकंब येथे आजअखेर ९ हजार १५१ हेक्टरची ऊसनोंद झाली असून ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दोन्ही युनिटचे मिळून २६ लाख मे. टन गाळप होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
बबनराव शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असून, आजारपणातून लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत सक्रिय व्हावेत, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी श्रीगणेशाची आरती करून देवाला साकडे घातले. यावेळी कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील, वेताळ जाधव, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, लाला मोरे, पांडूरंग घाडगे, सुरेश बागल, सचिन देशमुख, असिस्टंट परचेस ऑफिसर एस. व्ही चौगुले, हेड टाईम किपर टी. ए. लोंढे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर आदी उपस्थित होते.