‘सोनहिरा’चे ३ लाख ७ हजार ९० टन उसाचे गाळप: माजी आमदार मोहनराव कदम

सांगली : ‘डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या चालू गळीत हंगामात आजअखेर ३ लाख ७ हजार ९० टन ऊस गाळप झाले आहे. २ लाख ४७ हजार ७४० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे,’ अशी माहिती अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली. अध्यक्ष कदम म्हणाले, ‘सोनहिरा साखर कारखान्याचा २६ वा गळीत हंगाम मोहनराव कदम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत कारखान्याने ३ लाख ७ हजार ९० टन उसाचे गाळप केले असून २ लाख ४७ हजार ७४० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. ११.५० टक्के सरासरी साखर उतारा आहे.

ते म्हणाले, कारखान्याची प्रतिदिन ९ हजार ५०० टन गाळप क्षमता वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या प्रतिदिन ९ हजार ६७० टन उसाचे गाळप सुरू आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती, आसवणी व इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखान्याने सुरुवातीपासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आता गरुड भरारी घेतली आहे. कारखान्याने यापूर्वीच सर्वाधिक ऊसदर देणारा साखर कारखाना म्हणून नावलौकिक मिळवला आहे, असे मोहनराव कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here